खरा मुद्दा, मराठी साहित्यविश्व प्रकाशक-लेखक-वाचक अशा तीनही पातळ्यांवर आत्मवंचनेतून बाहेर येऊन व्यावसायिक परिवर्तन घडवून आणण्याचा आहे...

काही मोजकेच अपवाद वगळता कोणीही मराठी प्रकाशक आपले छान चाललेय, असे म्हणताना सहसा आढळत नाही. अपवाद वगळता, मी केवळ लेखनावर मस्त जगतोय, असे कोणी एक लेखक म्हणताना आढळत नाही किंवा नैमित्तिक ग्रंथप्रदर्शने किंवा साहित्यसंमेलने वगळता कोणी एक वाचक साहित्यात रमलेला आढळत नाही... अकरा-बारा कोटी लोकसंख्या असलेल्या मराठी मुलुखात जेमतेम एक हजाराची आवृत्ती संपणे म्हणजे प्रकाशन-लेखकांसाठी ‘एव्हरेस्ट’ शिखर गाठणे असते!.......